Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर व उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची बिनविरोध निवड

Spread the love

 

खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीत अर्ज भरण्याची वेळ, आज सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 पर्यंत होती. परंतु नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी मीनाक्षी बैलूरकर व जया भूतकी यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दुपारी 3.00 वाजता ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. व नगराध्यक्षपदी मीनाक्षी बैलूरकर तर उपनगराध्यक्षपदी जया भूतकी यांची निवड झाल्याचे सांगितले.

यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी निवड झालेल्या दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार या नात्याने नगरपंचायतीला लागेल ते सर्वतोपरी सहकार्य व सहाय्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक विठ्ठल करंबळकर, मुख्य व्यवस्थापक तुकाराम हुंद्रे व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या मीनाक्षी बैलूरकर व जया भूतकी यांनी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व सर्व नगरसेवकांचे आभार मानले व आपण दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून सर्वांना विश्वासात घेऊन खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

यानंतर राजा शिवछत्रपती चौकातील, शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व फटाक्या वाजवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जांबोटी क्रॉस येथील बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर चौराशी देवी, रवळनाथ, सातेरी माऊली, श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आलिम एस नाईक, नगरसेवक विनायक कलाल, रफिक वारीमनी, गुंडू तोपिनकट्टी, नगरसेवक हनमंत पुजार, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, मंजू भुतकी, लोकेश कलबुर्गी तसेच नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!

Spread the love  आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *