
खानापूर : खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अमृत शेलार तर उपाध्यक्ष पदी मेघश्याम घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अध्यक्ष अमृत शेलार म्हणाले की, मी बँकेसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सभासदांनी तसेच संचालकांनी दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाची माळ माझ्या गळ्यात घातली आहे. माझ्यावरील या दृढ विश्वासाच्या जोरावर लवकरच आपली बँक शंभर कोटींचा टप्पा पार करेल, तसेच सभासदांसाठी नवनवीन योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल.
उपाध्यक्ष म्हणून मेघश्याम घाडी यांची निवडही बिनविरोध करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ संचालक रमेश नार्वेकर, डॉ. चंद्रकांत पाटील, परशराम गुरव, विठ्ठल गुरव, विजय गुरव, मारूती पाटील, अंजली कडोली, अंजूबाई गुरव, मारुती बिलावर, अनिल बुरूड यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Belgaum Varta Belgaum Varta