खानापूर : स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87 वर्ष) यांचे आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुलं व दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण साहेब यांच्या त्या पत्नी होत. तर समितीचे नेते प्रकाश चव्हाण यांच्या मातोश्री होत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीमध्ये आपले पती व्ही. वाय. चव्हाण साहेब यांच्या सोबत सीमा चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta