खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे पालकमंत्री – जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार….
खानापूर : खानापूर तालुक्यातील वाटरे आणि गांधीनगर कृषी पतीन संघासाठी सरकारकडून पत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. याला चार -पाच वर्षे उलटली तरी कर्ज पुरवठा करण्यात आला नाही, यासाठी शेतकऱ्यांनी याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही तालुका आणि जिल्हा डीसीसी बँकेकडून कोणताच प्रतिसाद न मिळता, टाळाटाळ सूरू आहे. काय हा प्रकार? शेतकऱ्यांचा भावनांशी का खेळत आहे बँक याची चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्या व टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे पालकमंत्री सतिश जारकीहोळी व जिल्हाधिकारी महमद रोशन यांच्याकडे भेट घेऊन केली.
यावेळी तालुक्यात डीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे त्रास दिला जातोय, राजकारण कशाप्रकारे केले जात आहे याचीही माहिती यावेळी देण्यात आली. वेळेत नवीन शेअर्स करुन घेतले जात नाहीत, पाच -पाच वर्षे पत्त मंजूर केली जात नाही. काय चालले हे? अशा मनमनीचा किती दिवस शेतकऱ्यांनी मनस्ताप सहन करावा असे अनेक प्रश्न केपीसीसी सदस्य महादेव कोळी, तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महांतेश राऊत यांनी उपस्थित करत आपली तक्रार मांडली. यावर पालकमंत्र्यांनी डीसींना याबाबत तत्काळ बैठक बोलावून चौकशी करण्याचे आदेश दिले, शिवाय स्वतः बँक अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची हमी दिली. यावेळी काँग्रेस नेते सुरेश जाधव, तोहीब चांदकनावर, आमदार राजू शेठ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta