खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि त्यांचे पती राज्याच्या गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक तथा जनसंपर्क व माहिती आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. २४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. उभयतांनी त्रिवेणी संगमावर पवित्र गंगा स्नान केले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर भरलेला कुंभमेळा भारताच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून पवित्र ठिकाणावरील पवित्र स्नानामुळे समाजकार्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी उभयतांनी राज्यातील जनतेच्या सुख, समाधान आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी गंगा नदीच्या पात्रात बोटीतून सफरीचा आनंदही घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta