खानापूर : खानापूर तालुक्यातील सातनाळी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा सुवर्णमहोत्सव व माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 23 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. खोत यांनी केले. फोटो पूजन व दीपप्रज्वलन नितेश मिराशी, नमिता मिराशी व ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बी. एम. पाटील, सुनील कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार वासुदेव चौगुले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामचंद्र गावकर यांनी केले. माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष पांडुरंग नाईक, सीआरसी प्रमुख लोंढा सुनील शेरेकर, सीआरसी प्रमुख गुंजी बी. ए. देसाई, सीआरसी प्रमुख चापगाव एफ. आय. मुल्ला आदी उपस्थित होते.