खानापूर : मणतूर्गा गावानजीक सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने मणतूर्गा भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना कळविताच तात्काळ पोलिसांची 112 क्रमांकाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व घटनेची सविस्तर माहिती घेण्यात आली. मात्र अज्ञाताचा शोध लागला नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर हेमाडगाव अनमोड रस्त्यावरील शेडेगाळी नजीक असलेल्या रेल्वे गेटच्या ठिकाणी नवीन ब्रिजची निर्मिती व रेल्वे लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यापासून सदर मार्ग बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे प्रवासी वर्ग खानापूर-असोगा मार्गावरून ये-जा करत आहेत. त्यामुळे या भागातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु काल सोमवारी रात्री मणतूर्गे गावाबाहेर निर्माण करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही खाजगी वाहनांवर अज्ञात आणि दगडफेक केली त्यामुळे संबंधित कारचालकाने याची माहिती खानापूर पोलीस स्थानकाला दिली. लागली 112 क्रमांकाची पोलीस गाडी त्या ठिकाणी दाखल झाली. मात्र तोपर्यंत दगडफेक करणारा अज्ञात माथेफीरू तेथून पलायन केले असल्याचे समजते सदर घटना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी करण्यासाठी अज्ञाताने वाहनांवर दगडफेक केली असल्याचा संशय गावकरी व्यक्त करत आहेत. याबाबत मणतूर्गा ग्रामस्थांनी तसेच पोलीस प्रशासनाने तपास करून या घटनेचा छडा लावणे आवश्यक आहे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.