खानापूर : खानापूर शहरातील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये शहापूर येथील विनायक मेलगे (वय वर्षे 40) हे जेवणासाठी गेले होते. त्यांच्यावर त्याच हॉटेलच्या आवारात बसलेल्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना 23 मार्च रोजी रात्री खानापूर -गोवा मार्गावरील एका नामांकित हॉटेल आवारात घडली आहे. सदर घटनेनंतर जखमी विनायक यांना त्याच्याच नातेवाईकांनी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे या हॉटेलचे ग्राहक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. एरवी बाहेर रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला पाहायला मिळत असतो परंतु हॉटेलच्या आवारात कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे हॉटेलचे ग्राहक व नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.