
खानापूर : नंदगडमध्ये ४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६८ वर्षीय नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे.
ही संतापजनक घटना २४ फेब्रुवारी २०२४ रोजी नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. निसार अहमद फक्रू साब चापगावी (वय ६८, रा. काकर गल्ली, नंदगड) याने चॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षीय बालिकेला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना उघड झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी नंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी जलद तपास करत १७ एप्रिल २०२४ रोजी पॉक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच, आरोपीला २८ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तपास अधिकारी आर. एस. केमाळे यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आणून देत भक्कम युक्तिवाद केला. सध्या आरोपीची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta