
खानापूर : मावशीच्या गावी जत्रेला आलेल्या युवकाचा तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देमिनकोपमध्ये (ता. खानापूर) रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. तरुण चलवादी (वय २१, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ) येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, त्या निमित्ताने तरुण आपल्या मावशीकडे आला होता. आज घरात स्वच्छता करून कपडे धुण्यासाठी कुटुंबीय तलावावर गेले होते. त्यावेळी तरुण पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र त्याला चांगले पोहता ययेत नसल्याने तो पाण्यात बुडाला व कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta