खानापूर : खानापूर तालुक्यातील चिकदिनकोप येथील युवक महावीर गुंडू हनीगोळ (वय 26) याने आज मंगळवार दि. 8 मार्च रोजी दुपारी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिकदिनकोप येथील महावीर गुंडू हनीगोळ या युवकाची शेती अल्पशा स्वरूपात असून, त्याला तीन लाखाचे कर्ज झाले होते. शेती पण कमी असल्याने कर्ज भरायचे कसे या काळजीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आला. नंदगड पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. मृतदेह उशिरा किंवा उद्या सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात नोंदविण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.
Belgaum Varta Belgaum Varta