
खानापूर : केआयएडीबीने शेतकऱ्यांना नोटीस पाठविलेल्या होत्या त्यावर शेतकऱ्यांनी केआयएडीबी ऑफिसला जाऊन आपला विरोध नोंदविला होता, नंतर दुसऱ्या वेळी बेळगाव येथे विरोध नोंदविला. अनेकवेळा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विरोध करून वापस पाठविले, मात्र रेल्वे अधिकारी थोडीशी जमीन घेतली जाणार म्हणून सांगत असतानाच आता फक्त बेळगाव जिल्ह्यातून 1200 एकर जमीन अधिग्रहित केली जाणार असल्याने शेतकऱ्याला पूर्णपणे संपवण्याचा हा डाव आहे. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन संपवण्याचा हा प्रकार आहे. बेळगाव- धारवाड रेल्वे लाईनला आम्ही कधीच विरोध केला नव्हता आणि पुढेही करणार नाही आमची मागणी एकच आहे की पिकाऊ जमिनीतून मार्ग न काढता खडकाळ नापीक जमिनीतून मार्ग काढावा, अशी मागणी गर्लगुंजी येथील शेतकरी प्रसाद पाटील यांनी केली आहे.
स्व. सुरेश अंगडी आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्या वयक्तिक स्वार्थापायी सर्व अधिकाऱ्यांवर दबाव घातला जात आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकली गेली असती तर 6 कि. मी. अंतर कमी झाले असते आणि सुपीक जमिनी वाचल्या असत्या. सरकारचे 200 ते 250 कोटी वाचले असते. लोंढा – मिरज मार्गाला हजार कोटी पेक्षा जास्त का खर्च केला गेला याच उत्तर सरकारने द्यावे. तिथं अवाढव्य पैसे खर्च आणि इथ ही खर्च यावरून सरकारची मानसिकता समजते.
या मार्गात नागिरहाळ ते के. के. कोप्प दरम्यानच रेल्वे स्टेशन का? गर्लगुंजी येथे स्टेशन करावे. एकीकडे रिंग रोड, कळसा भांडूरा हे प्रकल्प राबवून कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात आहे. गर्लगुंजी परिसरातील सर्व शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसात भेटून चर्चा करणार आहोत, अशी माहितीही प्रसाद पाटील यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta