
खानापूर : कौंदल येथील सामाजिक कार्यकर्ते व करंबळ ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य व भाजपाचे कार्यकर्ते उदय भोसले (वय 42 वर्ष) यांच्या दुचाकीला अज्ञात कारचालकाने पाठीमागून धडक दिल्याने उदय भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना खानापूर – बेळगाव मार्गावरील देसूर येथील पुलावर घडली. तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रशांत पाटील (वय 42 वर्ष) (भारतीय सेना) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. कार चालकाने पाठीमागून दुचाकीला धडक देऊन कार चालक पसार झाल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta