
खानापूर : तालुका खानापूर वड्डेबैल ग्रामस्थ व श्री महालक्ष्मी सेवा अभिवृद्धी संघ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आयोजित करण्यात आला होता. सदर गावामध्ये महालक्ष्मीचे मंदिर आकार घेत असून परिसरामध्ये स्वच्छता व वृक्षवेलीचे महत्व जाणून घेऊन कार्यकर्त्यांनी प्रत्येकी एक वृक्ष प्रमाणे लागवड केली व जोपासना करण्याची प्रतिज्ञा केली. महालक्ष्मी मंदिर परिसर वृक्ष व इतर घरांची लागवड करण्यात येणार असून सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औचित्य साधून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकसचे इंजिनियर पी. आर. पाटील तसेच टाटा मोटर्स अकाउंटंट प्रशांत पाटील, शिक्षक व्ही. बी. पाटील. अरुण कडवी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कल्लाप्पा मल्लाप्पा पाटील. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील. पैलवान मारुती पाटील, सॉफ्टवेअर इंजिनियर प्रमोद पाटील बेंगलोर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta