
खानापूर : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन अखेर कुसमळी पुलाजवळ बांधलेला पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे बेळगाव-चोर्ला मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने परिसरात सर्वत्र पाण्याची भर पडली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत पर्यायी पुलावर पाणी नव्हते. मात्र, रविवारी सकाळी मलप्रभा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने हा पर्यायी पूल वाहून गेला. नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने जांबोटी परिसरातील नागरिक, तसेच गोवा व बेळगावकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta