Tuesday , March 3 2026
Breaking News

माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सुपुत्राचे अभिनंदनीय यश

Spread the love

 

खानापूर : खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांचे सुपुत्र मल्हार हेमंत निंबाळकर यांनी यूसी डेव्हिस विद्यापीठातून दुहेरी पदवी संपादन केली आहे.
मल्हार हेमंत निंबाळकर यांनी अर्थशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स अशा दोन पदव्या मिळवल्या आहेत. कॅलिफोर्नियातील सॅक्रॅमेन्टो येथील गोल्डन १ सेंटरमध्ये झालेल्या पदवीदान समारंभात हा सोहळा पार पडला. यावेळी मल्हार निंबाळकर यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेला कुर्ता आणि धोती परिधान करून कुलगुरूंचे ‘नमस्ते’ असे म्हणून स्वागत केले, ज्यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. आपल्या मुलाच्या या यशाबद्दल माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी हेमंत निंबाळकर म्हणाले की, अमेरीकेत वैद्यकीय पदवी मिळवण्याचे त्यांच्या आजोबांचे स्वप्न होते, जे आता मल्हारने पूर्ण केले आहे. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही आपल्या मुलाच्या कामगिरीचे कौतुक केले. या समारंभात डॉ. अंजली आणि हेमंत निंबाळकर यांची कन्याही उपस्थित होती.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *