शेतकऱ्यांचे जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना निवेदन!
खानापूर : चापगांव (ता.खानापूर) गावच्या परिसरात पिल्लासह एका अस्वलाचा वावर होत असून त्याच्यापासून शिवारात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. त्या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन चापगांव परिसरात शेतकऱ्यांनी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वाखाली बेळगांव जिल्हा मुख्य वनसंरक्षण अधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, चापगांव परिसरात गेल्या काही दिवसापासुन एका अस्वलाने आपल्या पिल्लासह शिवारात धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे शिवारात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांतून भितीचे वातावरण पसरले आहे. या अस्वलापासुन शेतकऱ्यांच्या जीवाला धोका संभवतो. तेव्हा या अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चापगाव, आल्लेहोळ, शिवोली व वड्डेबैल गावच्या शेतकऱ्यांतून होत आहे.
निवेदन देताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले, ऍड. अभिजीत सरदेसाई, विद्यमान सदस्य सूर्याजी पाटील, कल्लाप्पा कोडेचवाढकर, अभिजीत पाटील, प्रभू कदम, परसराम अंधारे, विघ्नेश अंगडी, आदित्य परशुराम येळगुळकर तसेच विठ्ठल मर्याणी पाटील, गजू पाटील व इतर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta