
खानापूर : खानापूर येथील नगरपंचायतीची बऱ्याच दिवसानंतर बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक आप्पया कोडोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. आज बुधवार दिनांक 18 जून रोजी नगराध्यक्षा मीनाक्षी बैलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 11 जणांचा सहभाग असलेली स्थायी कमिटीची रचना करण्यात आली. आप्पया कोडोळी यांनी यापूर्वी एक वेळ स्थायी कमिटी चेअरमन पद भूषविले आहे. ही त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेटी व नगरसेवक, नगरसेविका व नगरपंचायतीच्या कर्मचारी वर्गाने, आपय्या कोडोळी यांचा हार घालून सत्कार केला. बैठकीत मार्च एप्रिल मे महिन्यात झालेल्या जमा खर्चाला मंजुरी देण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी खानापूर शहराच्या विकासाबाबत चर्चा केली. बैठकीला उपनगराध्यक्ष जया भूतकी, माजी नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक विनायक कलाल, नारायण ओगले, रफिक वारीमनी, लक्ष्मी अंकलगी, फातिमा बेपारी, प्रकाश बैलूरकर, राजश्री तोपिनकट्टी, मेघा कुंदर्गी तसेच इतर नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta