
खानापूर : आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत हजारो वारकरी सहभागी होण्यासाठी जात असतात. संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाचे वारकरी दक्षिण गोवा ते पंढरपूर पर्यंत पायी दिंडी जाणार आहेत. दिंडीची सुरुवात दक्षिण गोव्यातून करून बाली, सावर्डे, धडे, मोलम, अनमोड, अखेती, मेरडा आदी मार्गाने येऊन मणतुर्गा येथे आज सायंकाळी आगमन झाले.
मणतुर्गा गावचे वारकरी मल्लाप्पा देवलतकर, शांताराम पाटील, चांगदेव मांगीलकर, बळीराम देसाई, मारुती पाटील, अरुण पाटील, मनोहर गुंडपीकर, बालाजी पाटील, प्रभाकर बोभाटे, प्रकाश पाटील, दत्तू पाटील, मारुती दळवी, विजय भटवाडकर, दीपक पाटील, बळवंत देसाई आदी मणतुर्गा ग्रामस्थांनी या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ दक्षिण गोवा यांचे मणतुर्गा गावच्या वतीने स्वागत केले. या वारकरी मंडळात जवळजवळ 108 वारकरी मंडळी आहेत. त्यांची आज राहण्याची सोय मणतुर्गा येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आलेली आहे. उद्या सकाळी त्यांचे मणतुर्गा गावातून सकाळी पुन्हा दिंडी मार्गस्थ होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta