
खानापूर : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे निर्माण करण्यात येत असणाऱ्या पुलाची आज बुधवारी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
बेळगाव- जांबोटी मार्गावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवर नव्याने पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर पर्यायी रस्ता करण्यात आला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून त्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे. आज बुधवारी या रस्त्याची स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानी पाहणी केली असून या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच बेळगाव -जांबोटी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta