
खानापूर : लोंढा झोनच्या नेरसे बीटमध्ये गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता एका हरीणाची (सांबर)ची शिकार करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळताच त्या माहितीच्या आधारे, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, नेरसे वन सर्वेक्षण क्रमांक 102 ला लागून असलेल्या मलकी सर्वेक्षण क्रमांक 104/2 मध्ये एकूण 9 आरोपींनी हरीणाची शिकार केल्याचे निश्चित झाले. यासंदर्भात, गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपींना आज शुक्रवार दि. 27 जून रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये रणजित जयसिंग देसाई, बळवंत नारायण देसाई, आत्माराम यल्लप्पा देवळी, प्रमोद नामदेव देसाई, दत्तराज विलास हवालदार, ज्ञानेश मंगेश गावडे, गोविंद रामचंद्र देसाई, अप्पी इंगाप्पा हनबर, बारप्पा बाबू हनबर आदींचा समावेश आहे.
ही कारवाई बेळगाव परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण आणि उपवनसंरक्षक मारिया क्रिस्टो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सुनीता निंबर्गी (सहायक वनसंरक्षक, खानापूर उपविभाग), श्रीकांत पाटील (विभागीय वन अधिकारी, खानापूर), सय्यदसाबा नदाफ (विभागीय वन अधिकारी, भीमगड), आणि वाय एस पाटील (उप-विभागीय वन अधिकारी, लोंडा) आणि खानापूर आणि भीमगड झोनमधील कर्मचारी, उपस्थित होते. एकूण नऊ आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta