
खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम परसराम सुतार यांचे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी तुकाराम परशराम सुतार यांच्या घराची पडझड झाली असून तुकाराम सुतार हे शेडू पासून गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असतात मात्र घर पडल्यामुळे त्यांनी तयार केलेल्या शंभर ते सव्वाशे गणेश मूर्ती मातीच्या ढिगार्याखाली सापडल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते शेडू पासून गणेश मूर्ती तयार करतात. तसेच मेरडा आणि परिसरातील लोक गणेश मूर्ती घेऊन जात असल्याने काही दिवसांपासून गणेश मुर्त्या बनवण्याची काम जोरात चालू केले होते पण घर कोसळल्याने आतापर्यंत केलेली सर्व मेहनत घराबरोबरच जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे ते खचून गेले आहेत.
सुतार यांच्या घराची पडझड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मेरडा येथील कोल्हापूर स्थित उद्योजक कल्लाप्पा कृष्णाजी पाटील उर्फ के के पाटील संस्थापक अध्यक्ष खानापूर बेळगाव युवा संघ यांनी सुतार कुटुंबीयांबरोबर त्यांच्या पडलेल्या घराची पाहणी केली व तुकाराम सुतार यांना आर्थिक मदत म्हणून 5 हजार रुपयांची देणगी देऊन मदत केली. त्यांच्या समवेत हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील मारुती पाटील, सदस्य रणजीत पाटील (हलगा), सदस्य पांडुरंग कृष्णाजी पाटील (मेरडा), पी के पी एस उपाध्यक्ष लक्ष्मण दत्ताराम पाटील, (करजगी) गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, कलमेश्वर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक लक्ष्मण बाळू पाटील उपस्थित होते. हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने अध्यक्ष सुनील पाटील, पंचायत सदस्य पांडुरंग पाटील, ग्रामपंचायत पीडीओ निंगाप्पा अक्षी त्याचबरोबर हलगा तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य पंचनामा करून सरकारकडे योग्य पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती दिली आहे तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांना आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta