खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अतिथी शिक्षक म्हणून सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळात सेवा बजावत असलेल्या प्राथमिक शाळेतील ५३८ अतिथी शिक्षक तर माध्यमिक शाळेतील १७ अतिथी शिक्षकांचे मानधन सरकारने वितरित केले आहे.
यासाठी ९.०४ लाखाचा निधी खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असुन लवकरच ते संबंधित प्राथमिक अतिथी व माध्यमिक अतिथी शिक्षकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.
खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांमधून जवळपास ८०० हुन अधिक शिक्षक पदे रिक्त असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हेळसांड होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या नेमणूका होईपर्यंत तरी सध्या अतिथी शिक्षकांची नेमणूका केल्या आहेत.
यंदा शाळांना उशीरा सुरू झाल्याने अतिथी शिक्षक नेमणूक प्रक्रिया खूपच उशीरा सुरू झाली.
त्यामुळे केवळ तीनच महिने अतिथी शिक्षकांना सेवा बजावयला मिळणार आहे.
यामध्ये प्राथमिक शाळा शिक्षकांना ७५०० रूपये, तर माध्यमिक अतिथी शिक्षकांना ८००० रूपये मानधन देण्यात येणार आहे. आता लवकर मानधन अतिथी शिक्षकांना मिळणार आहे.