संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते शेट्टींमनी सिमेंट दुकानापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर रस्ता चौपदरी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. डाव्या बाजूचा रस्ता हाॅटेल राजधानी पुढे शेट्टीमनी यांच्या सिमेंट दुकानापर्यंत करुन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता उजव्या बाजुच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. वन-वे रस्ता पार करताना पोस्टानजिक ट्राॅफिक जाम होऊ लागली आहे. यातून मार्गाक्रम करतांना वाहनचालकांंचे नाके नव होऊ लागले आहेत. येथील ट्राॅफिक जामच पोलिसांना, पालिका अधिकारींना सोयरसुतक वाटेनासे झालेले दिसत आहे. येथूनच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडी, अवजड वाहने ये-जा करु लागल्याने ट्राॅफिक जाम होताना दिसत आहे. पोलीसांनी येथील मार्ग वळवून यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर येथे चांगलेच फसताना दिसताहेत. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर बैलगाडी अवजड वाहने बायपासने वळवून येथील मार्ग बसगाड्या, दुचाकी चारचाकी वाहने ॲटोरिक्षा यांना मोकळा करुन देण्याची मागणी विनोद संसुध्दी यांनी केली आहे.
