
मराठी भाषिक संतप्त
खानापूर : सीमाप्रश्न संपला आहे असे वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने तीव्र निषेध केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सदर विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला असून असे वक्तव्य मराठी भाषिक खपवून घेणार नाहीत. तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबत योग्य ती पावले उचलण्याची गरजेचे असे सूचित करण्यात आले.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्नी जे विधान केले ते त्यांना शोभत नाही. सीमाप्रश्न न्यायालयात आहे. मागील सहा दशकाहून अधिक काळ सीमाप्रश्नासाठी मराठी भाषिकांचा संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष सीमाप्रश्न सुटेपर्यंत करत राहणार आहे. यावेळी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते निषेध व्यक्त केले.
यावेळी बैठकीत कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, प्रकाश चव्हाण, वसंत नावलकर, राजाराम देसाई, विठ्ठल गुरव, मर्याप्पा पाटील, रणजीत पाटील, डी.एम. भोसले, भीमसेन करंबळकर, संजीव पाटील, राजाराम देसाई, कृष्णा कुंभार, ब्रह्मानंद पाटील, आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta