
खानापूर : नुकताच झालेल्या सीए परीक्षेमध्ये ज्योती संभाजी शटवाजी- पाटील हिने घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मूळचे कुणकीकोप तालुका खानापूर येथील व सध्या विनायक नगर पिरनवाडी येथे वास्तव्य असणारे संभाजी पाटील यांची कन्या असून ती बालपणापासून एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती. तिचे प्राथमिक शिक्षण संत मीरा शाळा आंनगोळ येथे झाले, नंदगड (ता. खानापूर) येथील महात्मा गांधी महाविद्यालयात तिने पियूसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गोगटे कॉलेज बेळगाव येथे पदवी संपादन केली. प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीने तिने सी. ए. होण्यासाठी प्रयत्न केले. एक दोन वेळा अपयश आले मात्र खचून न जाता स्वतः नोकरी सांभाळून अभ्यास केला व सीए परीक्षेत यश संपादन केले कोणकीकोप सारख्या एका खेड्यातील साधारण शेतकरी कुटुंबातील मुलीने हे कौतुकास्पद कार्य केले आहे, त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ज्योती त्यांना पी. जी. भागवत व पती सीए संभाजी शटवाजी यांचे मार्गदर्शन लाभले, तरी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta