
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
खानापूर : गर्लगूंजी – बेळगाव बस नंदिहळी मार्गे जात असल्यामुळे गर्लगूंजी ते राजहंसगड या मार्गात येणाऱ्या 3 बस थांब्यावरील नागरिक तसेच विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. गर्लगूंजी ग्राम पंचायत आणि नागरिक यांच्या प्रयत्नाने बेळगाव गर्लगूंजी सेंट्रल बस सुरू करण्यात आल्या होत्या पण खासदार जगदीश शेट्टर यांनी केएसआरटीसीला दिलेल्या पत्रामुळे पत्रामुळे बस नंदीहळी मार्गे जात होती, तसेच दुसरी बस आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिलेल्या पत्रामुळे तोपिनकट्टी पर्यंत जात होती पण या सर्वामुळे बसेस गर्लगूंजी येथील सर्व बस थांब्यावर जात नव्हती आणि वेळा पत्रकात फरक पडल्यामुळे विद्यार्थी नागरिक यांची गैरसोय होत होती. कॉलेज शाळा आणि कामावर जाणाऱ्यांना गैरसोय होत होती. गर्लगूंजी ग्राम पंचायतने बरेच वेळा बेळगाव डेपो मॅनेजर याना विनंती केली पण मार्ग निघत नव्हता शेवटी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. जवळपास 3 तास चक्काजाम झाल्यानंतर खानापूर विठ्ठल कांबळे, कंट्रोलर यांनी रस्ता रोको केलेल्या ठिकाणी भेट दिली आणि सर्व अटी मान्य केल्या खानापूरचे पोलीस निरीक्षक गवंडी यांनी नागरिकांशी संपर्क साधला आणि या प्रसंगी स्टेशन मधून 2 ए एस आई, 2 हवालदार, कॉन्स्टेबल उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत आपल्या अटी मान्य झाल्याशिवाय रस्ता खुला करणार नाही अशी सर्व सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली. आपल्या गावाच्या बसेस आपल्या गावा पूर्त्या मर्यादित ठेवाव्या अशी मागणी या प्रसंगी केली गेली..
यावेळी सर्व गोपाळ मुरारी पाटील, पांडुरंग सावंत, हणमंत मेलगे, अजित पाटील, सुरेश मेलगे, प्रसाद पाटील, मऱ्यापा पाखरे, सोमनाथ यरमाळकर, गोकुळ चौगुले, विनोद कुंभार, मारुती पाटील, लक्ष्मण मेलगे, शांताराम मेलगे, सुनील पाटील, पुंडलिक पाटील, अनिल मेलगे, श्री पाटील, श्रेयस निटूरकर, नारायण कोलेकर, बाबुराव मेलगे, कलापा लोहार, मऱ्याप्पा मरकट्टी, विलास पाटील, मारुती कोलकार, चनापा बुरुड, सदानंद पाटील, चनापा मेलगे, महेश करेगार आणि ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta