
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
बेळगाव : आज मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चापगांव येथे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मराठी संस्कृती व मराठी शाळा टिकविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकदा मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुक्याचे उपाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष माननीय श्री. रमेश धबाले यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष श्री. मष्णू चोपडे हे होते. यावेळी एसडीएमसी सदस्य श्री. अभिजीत अशोक पाटील, गावकरी श्री प्रभू कदम, परसू कदम यांनी देखील उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेश कवळेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री. रमेश धबाले यांनी मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत व शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वांनी भर दिला पाहिजे असे सांगितले. एसडीएमसी अध्यक्ष श्री. मष्णू चोपडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल प्रथमता आभार मानले. व त्यांच्या या कार्याला शुभेच्छाही दिल्या. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta