
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
खानापूर : हेमाडगा (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत सोमवार दिनांक 14 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. शाळेत “श्री कलमेश्वर विद्यार्थी बचत बँक” च्या उपक्रमाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय निर्माण करणे आणि त्यांना आर्थिक नियोजनाची प्राथमिक ओळख करून देणे आहे.

उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानांकुर फॉउंडेशनचे संचालक थॉमस डिसोझा, सामाजिक कार्यकर्ते विजय मादार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व पटवून दिले आणि या उपक्रमाच्या प्रशंसेस्पद भूमिकेची स्तुती केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष सुरेश देसाई होते. कार्यक्रमाला सर्व एसडीएमसी सदस्य, पालक, शाळेच्या शिक्षिका वेदिका अय्यर, स्नेहा खांबले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या बँकेत प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे बचत खाते उघडता येणार असून, नियमित बचत करून ते भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. शाळेतील 7वी च्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून, इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक किशोर शितोळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिक्षक जी. एम इंचल यांनी मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात एक प्रेरणादायक पाऊल ठरेल, असा विश्वास सीआरपी बी. ए. देसाई यांनी व्यक्त केला व नूतन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta