
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
—————————————————————–
खानापूर : रात्रीच्या वेळी रेल्वेत झोपलेल्या एका तरुणाचा खिसा कापून चोरट्यांनी सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खानापूर तालुक्यातील लोंढा-मिरज रेल्वेत घडली आहे.
लोंढा गावातील दीपक मड्डी हे शुक्रवारी रात्री मिरज-लोंढा पॅसेंजर रेल्वेने बेळगावहून लोंढा मार्गे प्रवास करत असताना मध्यरात्री त्यांना झोप लागली. लोंढा स्टेशन येऊन एक तास उलटला तरी ते जागे झाले नाहीत. जागे झाल्यावर पाहिले असता, खिशातील पाकीट कोणीतरी चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कागदपत्रे लोंढा ग्रामपंचायतीजवळच्या परिसरात फेकून दिली होती. या चोरीमध्ये ओळखपत्र, ९३०० रुपये रोख रक्कम आणि १ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे नाणे चोरट्यांनी पळवले आहे.
दीपक मड्डी यांनी या संदर्भात रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत असून, सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या वेळी एका अनोळखी व्यक्तीचे दृश्य कैद झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta