
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————
——————————————————————-
खानापूर : खानापूर- हेम्माडगा अनमोड मार्गावरील मनतुर्गा येथील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्यामुळे अवजड वाहने वगळता या मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ भुयारी मार्गावरील पाण्याच्या निचऱ्याची सोय करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. नुकताच मनतुर्गा जवळील रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर भुयारी मार्ग सकल असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. हा भुयारी मार्ग निर्मिती करत असतानाच त्या भागातील जाणकार नागरिकांनी भुयारी मार्ग सखल असल्यामुळे पावसाचे पाणी या मार्गावर साचण्याची शंका व्यक्त केली होती व पाण्याचा निचरा योग्यरीतीने करण्याची सूचना देखील रेल्वे अभियंता व ठेकेदार यांच्याकडे केली होती. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करून पाणी निचऱ्याची सोय न करता भुयारी मार्गाचे काम करण्यात आले. परिणामी नागरिकांची शंका खरी ठरत कालपासून पडत असलेल्या पावसामुळे आसपासच्या शेतवडीतील पाणी भुयारी मार्गात साचले आहे व या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सदर मार्गाला सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून अवजड वाहतूक करणारी वाहने या पाण्यातून वाट काढीत प्रवास करीत आहेत तर रस्त्यावर जवळपास तीन फूट पाणी साचल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना असोगा मनतुर्गा मार्गे प्रवास करावा लागत आहे. संबंधित रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीची पाहणी करून भुयारी मार्गावर साचलेले पाणी अन्यत्र वळवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालक करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta