
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/
——————————————————————–
——————————————————————–
उपक्रमाचे आठवे वर्ष : मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी समितीचा प्रयत्न
खानापूर : मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या बाढावी, मराठी शाळा टिकाव्यात, शाळेच्या माध्यमातून मराठी संस्कृती, मराठी भाषा टिकली जाणार आहे. यासाठी बेळगावसह खानापूर, निपाणी, बेळगाव तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम गेली पाच वर्षे युवा समितीचे कार्यकर्ते राबवत आहेत, अशी माहिती युवा समितीचे श्रीकांत कदम यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यावतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.
त्याचाच एक भाग म्हणून युवा समितीतर्फे सोमवारी नंदगड परिसरातील हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, सागरे, हलगा, भुतेवाडी, हेबाळ, नंजिनकोंडल आसपासच्या गावातील शाळांमधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले. नंदगड येथील संत गेलगे सरकारी मराठी शाळा व जेसीएस सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संत मेलगे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश मादार यांनी स्वागत केले.
मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा यावेळी विद्यार्थ्यांना गार्गदर्शन करताना पुंडलिक कारलगेकर म्हणाले, आतापर्यंत मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून गावातील सरकारी मराठी शाळांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी विविध संघटनांकडून पुढाकार घेतला जात आहे. त्याला युवा समितीची साथ मिळत असल्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच कणकुंबी-जांबोटी भागातील ३५ शाळांमध्ये शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात खानापूर परिसरातील शाळांमधून साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
पाच हजार विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण युवा समितीच्या या उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी बेळगाव, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील जवळपास दोनशे शाळा आणि पाच हजार विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील ७० शाळांमध्ये हे वितरण होत आहे, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त मदत मिळावी यासाठी युवा समिती प्रयत्नशील हा उपक्रम राबविण्यासाठी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, वासु सामजी, राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, विनायक कावळे, प्रतीक पाटील, आशिष कोचेरी, जोतिबा पाटील, आनंद पाटील , रोहित गोमानाचे, किरण मोदगेकर, रितेश पावले, अशोक पाटील, आकाश भेकणे, साईनाथ शिरोडकर, निखिल देसाई, प्रवीण धामणेकर, सौरभ तोंडले, अक्षय बांबरकर हे विशेष प्रयत्न करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta