Monday , December 8 2025
Breaking News

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे निवडणूक संपन्न!

Spread the love

 

खानापूर : भारत प्रजासत्ताक देश आहे, जिथे लोकशाहीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकशाहीत कारभार चालवितात म्हणूच त्यांना लोकप्रतिनिधी असे संबोधन केले जाते. लोकशाहीत मतदाराला “राजा” असे आदराने म्हटले जाते, कारण मतदारच राजकारणाचा कर्ताकरविता असतो..
निवडणूक ही लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची एक सुक्ष्म प्रक्रिया असते, ती प्रकिया आकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना समजावी म्हणून एकंदर निवडणूक प्रक्रियेत अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचा समावेश करून, आचारसंहितेचा भंग म्हणजे काय? शिवाय आचार संहिता का लावली जाते? ती कधी पूर्ण होते? तिचे उल्लंघन का करू नये?. मतदारांच्या डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला “अमिट शाईचा” वापर व मतदान केंद्र आणि मतदान केंद्रात आवश्यक असणाऱ्या बाबी पूर्ण करून, अगदी एक दोन वर्षात आपला मतदानाचा खरा ह्क्क बजावू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनींना. सहप्रात्यक्षिक अनुभव देण्यासाठी या निवडणूका काॅलेजमध्ये घेण्यात आल्या.
नेहमीच विधायक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात यावर्षीच्या निवडणूका अभ्यासपूर्णरित्या मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली व काॅलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्या प्रोत्साहनातून खूपच रंगतदार ठरल्या.
चुरशीच्या निवडणूकीत कुमारी लक्ष्मी एम. गोरल ही वाणिज्य शाखेची बारावीची विद्यार्थिनी जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आली तर साधना एम. होसुरकर कला शाखा, ही उपजनरल सेक्रेटरी बनली. शिक्षण मंत्री राजेश्वरी पी. राटोडकर शिवाय प्रतिक्षा एस. पवार ही उपशिक्षण मंत्री म्हणून निवडून आली.
क्रीडा मंत्री निलम कक्केरकर व प्राजक्त कक्केरकर, स्वास्थ्य व स्वच्छता मंत्री कु. प्राप्ती पी. पाटील व कु. मनाली बाचोळकर आणि सहल मंत्री म्हणून कु. धनश्री पाटील व कु. ऐश्वर्या कोळी या सर्वजणी कमी जास्त मताधिक्याने निवडून आल्या आहेत.
तसेच प्रथम वर्ष कला शाखा वर्ग प्रतिनिधी म्हणून कु. वैष्णवी देवळी, प्रथम वर्ष वाणिज्य वर्ग ‘अ’ प्रतिनिधी कु. नेहा नाईक, ‘ब’ कु. श्रेया पाटील, द्वितीय वर्ष कला शाखा वर्ग प्रतिनिधी कु. सोनिया देवलतकर, द्वितीय वर्ष वाणिज्य ‘अ’ वर्ग प्रतिनिधी कु. मालाश्री पाटील, ‘ब’ वर्ग प्रतिनिधी कु. सबिना लोबो यांची निवड झाली आहे व उपप्रतिनिधी म्हणून कु. मेघा नाईक, कु. खतिजा सडेकर, कु. स्नेहा फटाण, कु. श्रृती हुडेदार, कु. लुसियांना लोबो व कु. वनश्री मन्नोळकर यांची निवड झाली आहे. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी काॅलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री. एन. ए. पाटील, प्रा. नितीन देसाई, प्रा. श्रीमती एस. सी. कणबरकर, प्रा. टी. आर. जाधव, प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. आर. व्ही. मरितम्मणावर, प्रा.श्रीमती एम. वाय. देसाई, प्रा. श्रीमती व्ही. एम. गावडे, प्रा. सोनल पाटील, प्रा. दिपाली निडगलकर, जोतिबा घाडी व संगणक व्यवस्थापिका सौ. सीमा सावंत-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *