
खानापूर : बेकवाड (तालुका खानापूर) येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील या शेतकऱ्याची बैलजोडी बुधवार दिनांक 16 जुलै रोजी बेकवाड येथील तलावामध्ये बुडून मरण पावली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी बेकवाड या ठिकाणी श्री.गुंजाप्पा पाटील या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांंचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.

प्रसाद पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठीवर कायम असतात. या भेटी प्रसंगी शेतकरी कुटुंबाला धीर देत आपण या दुःखात सहभागी आहोत आणि अशी दुर्घटना कोठेच घडू नये अशी भावना बोलून दाखविली. शांत स्वभावाची बैलजोडी गेल्यामुळे शेतकरी कुटुंबामध्ये दुःखद वातावरण आहे. या दुःखातून बाहेर या आणि नवीन अशीच बैल जोडी घ्या अशी विनंती प्रसाद पाटील यांनी केली आणि स्वतः त्या कुटुंबाला 10000 रू. मदत केली. शेतकरी पाटील याना या प्रसंगी गहिवरून आले. या प्रसंगी सदानंद पाटील, रामचंद्र लोहार हे ही उपस्थित होते. त्यांनीही कुटुंबाचे सांत्वन केले.

Belgaum Varta Belgaum Varta