
ओलमनी शाहू हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
जांबोटी : मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून दहावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा गुणगौरव व रोख पारितोषिक वितरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 रोजी ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव च्या वतीने मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या 10 विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येते गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेमध्ये मराठी माध्यमात मराठा मंडळ हायस्कूल खानापूरचा विद्यार्थी चाळोबा अळवणी (611 गुण) घेऊन प्रथम तसेच ओलमणी राजर्षी शाहू हायस्कूलचा विद्यार्थी समर्थ देसाई (609 गुण) द्वितीय तसेच ताराराणी हायस्कूलची मृदुला गावडे व जांबोटी हायस्कूलची दीक्षा देसाई यांनी प्रत्येकी (606 गुण) घेऊन तृतीय क्रमांक तसेच माऊली हायस्कूल गर्ल गुंजीची मयुरी कदम (599 गुण) ताराराणी हायस्कूलची नेहा सुंडकर (596 गुण) कन्या हायस्कूल नदगडची मेगा गुरव (594 गुण) ओलमणी हायस्कूलची साक्षी चव्हाण (592 गुण) माऊली हायस्कूलची प्रज्ञा देसाई (591 गुण) ताराराणी हायस्कूलची प्रगती होवेकर (591 गुण) शिवाजी हायस्कूल हलशी ची स्नेहा राणे (590 गुण) जांबोटी हायस्कूलचा अथर्व हळदनकर (580 गुण) बैलूर हायस्कूलचा यश सदावरकर (580 गुण) या विद्यार्थ्यांना खानापूर तालुक्यात मराठी माध्यमात पहिल्या दहा क्रमांकामध्ये उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व रोख पारितोषिक वितरण असा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता ओलमनी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. तरी वरील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक व मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगावचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ पाटील व अभियंता अरुण कदम यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta