Sunday , July 26 2026
Breaking News

वडगाव श्री मंगाई देवी यात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ…

Spread the love

 

बेळगाव : नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या बेळगावच्या वडगाव येथील श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला आज भाविकांच्या प्रचंड गर्दीत उत्साहात सुरुवात झाली. बेळगाव शहरातील ही सर्वात मोठी यात्रा असल्याने वडगावच्या नागरिकांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.

मानकरी चव्हाण-पाटील घराण्याकडून सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले असून, मंगळवारी देवीला गाऱ्हाणे उतरवून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. शेतातील पेरणीची कामे आटोपल्यानंतर मंगाई देवीची यात्रा उत्साहात साजरी करण्याची परंपरा आहे. वडगावसह संपूर्ण बेळगाव परिसरातील शेतकरी आणि कष्टकरी देवीची मनोभावे पूजा करत असल्याने या देवीला शेतकऱ्यांची देवी म्हणूनही ओळखले जाते. यात्रेपूर्वी देवीचे वार पाळले जातात. वारांदिवशी वडगावमधील कुमारिका परिसरातील देवदेवतांना भेटी देऊन पाणी घालत असतात.

या काळात मंदिरातील घंटा देखील बांधून ठेवण्यात येते. यात्रेत होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली असून, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्थाही केली आहे. गर्दी टाळण्यासाठी येळ्ळूर क्रॉस येथून बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.

 

वडगावच्या मुख्य रस्त्यापासून अंतर्गत भागात ठिकठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाई, आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. पाटील गल्ली, विष्णू गल्ली, वझे गल्ली कॉर्नर, राजवाडा कंपाऊंड येथे मनोरंजनात्मक खेळ, गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *