बेळगाव : गर्लगुंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलुर या गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊन केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल सदर गावाना दत्तक घेणार असल्याची माहिती गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील दिली.
गर्लगुंजीसह इतर पंचायतींना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस एमबीबीएस एमडी डॉक्टर आरोग्य तपासणीसाठी गावात उपलब्ध असणार आहेत, त्याचबरोबर मोफत ॲम्बुलन्स सेवा, मोफत किंवा एकदम कमी दरात औषधे त्याचबरोबर या गावातून जे रोगी हॉस्पिटलमध्ये जातील त्यांना मोफत आरोग्य तपासणी, त्याचबरोबर ऑपरेशन किंवा इतर खर्चिक बाबीसाठी वेगवेगळ्या स्कीममधून बिल मोफत करण्यासाठी प्रयत्न किंवा अत्यल्प दरात ऑपरेशन आणि ट्रीटमेंट केली जाणार आहे.
बऱ्याच दिवसापासून प्रसाद पाटील हे याचा पाठपुरावा करत होते. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या जन्मदिनापासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे असे केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई यांनी याविषयी चर्चा करताना सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रभावती उपस्थित होत्या. त्याचबरोबर निट्टुर ग्रामपंचायतचे सदस्य सदस्य नागेश नार्वेकर हेही उपस्थित होते.
आपल्याला या हॉस्पिटलमधून जनसंपर्क अधिकारी असलेले संतोष, विजय आणि सागर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. गरीबांना अत्यल्प दरात उपचार मिळतात त्यामुळे एक हजार पेक्षा जास्त पेशंटना आपण इथून चांगले करून घेतले असल्याचे यावेळी प्रसाद पाटील यांनी सांगितले. या हॉस्पिटलच्या ब्लड बँक मधून ही भरपूर गरजूंना रक्त देता आल्याचे आणि इतर हॉस्पिटल मधील पेशंटचे जीव वाचविल्याचे समाधान मिळाले, असेही प्रसाद यांनी सांगितले.
येथील डॉक्टर्स, नर्स आणि इतर ऑफिशियल स्टाफ भरपूर सहकार्य करतात. रेशन कार्ड, आधार कार्ड, यशस्विनी, वाजपेयी आरोग्य श्री, आणि इतर योजनामधून पेशंटना लाभ मिळविता येतो. इतर ही नागरिकांनी या हॉस्पिटल आणि योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रसाद पाटील यांनी केले आहे..

Belgaum Varta Belgaum Varta