रामनगर : कुंबेली तपासणी नाक्यावरील वनाधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना रामनगर येथे घडली असून नराधम वनाधिकाऱ्याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. लिंगप्पा लमाणी (वय ४५, रा. विजयपूर) असे या नराधम वनाधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, ओडिशा येथून आलेले एक कुटुंब रामनगर परिसरात खासगी व्यवसायाकडे मोलमजुरीसाठी आले आहे. या कुटुंबातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला कुंबेली तपासणी नाक्यावरील वनाधिकारी लिंगप्पा लमाणी याने हटकले. त्याला नाक्यावरील एका खोलीत कोंडून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. याची माहिती मिळताच पिडीताच्या आईने या संबंधी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लिंगप्पा यास अटक करण्यात आली.
पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रामनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta