खानापूर : कापोली (ता. खानापूर) येथील विष्णू नागेश जगताप यांचा बैल अचानकपणे दगावल्याने त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तसेच ऐन हंगामात कष्टकरी शेतकऱ्याची मोठी अडचण झाली आहे.
नागेश जगताप हे अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करीत आहेत. तसेच शेती व्यवसायावर त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहे. मात्र त्यांच्या बैलजोडीतील एक बैल अचानकपणे दगावल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. अचानकपणे बैल दगावल्यामुळे जगताप कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे त्यामुळे संबंधित विभागाने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

Belgaum Varta Belgaum Varta