खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डी एम एस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्प्रवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कर्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख कॉलेजच्या प्राचार्या दीपा हन्नूरकर यांनी करून दिली.
अभ्यासातील सातत्य, शिस्त, व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळेल असे मत कॉलेज सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील यांनी व्यक्त केले. कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर कदम, प्रा. एन. व्ही. पाटील रमाकांत पाटील निवृत्त शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा वेळी कॉलेज सुधारणा कमिटीचे सदस्य विठ्ठल गुरव, सुदेश दलाल, अरविंद काकतकर, मधुकर पाटील, प्रा. एम. एम. पूजार, प्रा बी. आर. देसाई, प्रा. आय. पी. गावडे, प्रा. एम. आर. मिराशी प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी, क्लार्क एम. टी. पाटील, मोहन धबाले पीयुसी प्रथम आणि पीयुसी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एकनाथ पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. एन. टी. पाटील यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta