
खानापूर : मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने हालात्री नाल्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी नारायण पाटील (वय ६५, रा. हारूरी) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी यांची गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. आज सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर त्या घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. पण, गावात त्या कुठेच दिसल्या नाहीत. नाल्याच्या बाजूने शोध घेत असतांना हालात्रीच्या मणतुर्गा पुलाखाली मृतदेह आढळला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला आहे. मयत लक्ष्मी यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन विवाहीत मुली असा परिवार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta