खानापूर : संविधानाने “एक व्यक्ती एक वोट” हा अधिकार दिलेला असताना निवडणूक आयोग वोटर लिस्टमध्ये घोळ घालत असून हा सरळ सरळ संविधानावर आघात असून निवडणूक आयोग वोट चोरी करत असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.
निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे यावर आता संशयाचे ढग निर्माण झाले असून निवडणूक आयोगास भाजपाच्या कुशीतून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे.
निवडणूक आयोगावर आरोप केले तर भाजपा का उत्तर देतोय? ईडी, सीबीआय या पण स्वतंत्र संस्था आहेत यांच्यावर आरोप झाले की भाजपा का उत्तर देतो याचे कारण एकच या संवैधानिक संस्था भाजपाच्या बटीक झाल्या आहेत आणि हे लोकशाहीसाठी घातक ठरतं असून देशात जर लोकशाही टीकवायची असेल तर या संवैधानिक संस्थानी निष्पक्षपणे काम करणे गरजेचे आहे आणि याचसाठी अखिल भारतीय काँग्रेसने देशभर “वोटर अधिकार यात्रा” काढण्याचे ठरविले आहे याचाच एक भाग म्हणून खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव व ओबीसी नेत्या डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता शिवस्मारक चौक खानापूर ते नंदगड “वोटर अधिकार पदयात्रा” काढण्यात येणार आहे. सर्वांनी संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊन पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले आहे.
खानापूर तालुक्यातील जनतेने तसेच संविधानावर प्रेम करणाऱ्यांनी, सर्व काँग्रेस पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्ते व युवक महिला यांनी पदयात्रेत सामिल व्हावे, ही नम्र विनंती.

Belgaum Varta Belgaum Varta