खानापूर काँग्रेसच्या वतीने “वोट अधिकार पदयात्रा”

खानापूर : व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून आजपासून “वोटर अधिकार यात्रे”ची सुरूवात केली. राहुल गांधी यांच्या निर्णयाला साथ म्हणून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनीही आज हाच धागा पकडून खानापूर काँग्रेसने “वोट अधिकार पदयात्रा” काढली …
खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी राहुल गांधीच्या पाऊलावर पाऊल ठेवत किंवा आपले नेते राहुल जी यांना पाठींबा म्हणून आपल्या मतदारसंघात आज खानापूर ते नंदगड अशी १२ कि. मी.ची पदयात्रा काढली.
सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची ही पदयात्रा सुरू झाली व संगोळी रायाण्णा समाधी नंदगड येथे दर्शन घेऊन पुढे या पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले. मार्केटिंग सोसायटीच्या हॉलमध्ये ही लहानशी सभा पार पडली. यामध्ये बोलतांना डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी भाजपा सरकार व निवडणूक आयोग यांच्या कार्यशैली विषयी चिंता व्यक्त केली व निवडणूक आयोगाने कोणाचे बटीक असल्यासारखे वागू नये, असेही सुनावले आणि तालुक्यात आम्ही काँग्रेस पुन्हा जोमाने उभी करू, असेही ताई म्हणाल्या. शेवटी खानापूर ब्लॉक काँग्रेस व तमाम कार्यकर्त्यांचे पदयात्रेत तसेच भर पावसात चालणाऱ्या सर्वांचेच करावे तेवढे कौतुक कमीच असेही माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या.
यावेळी महांतेश राऊत, लक्ष्मण मादार, सावित्री मादार, ॲड. घाडी यांची भाषणे झाली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन वाली सावकार यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

Belgaum Varta Belgaum Varta