
खानापूर : ताराराणी हायस्कूल खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
शाळेचे विद्यार्थी स्वप्नील गावकर, सानिका कोवाडकर, सानिका गावकर, मनुजा गावकर व संजना पाटील या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली आहे. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मंथन लाड, सतीश सावंत,शंकर खैरवाडकर, समीक्षा गावकर, प्रेमिला मेंडीलकर या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेचे आजी-माजी एकंदरीत दहा विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेल्याबद्दल तालुक्यातून अबनाळी शाळेचे विशेष कौतुक होत आहे. अबनाळी गावचे विद्यार्थी गेली दहा वर्षे सतत जिल्हा तसेच राज्य स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत.
या विशेष साधनेबद्दल खानापूर तालुक्याचे बीईओ पी. रामाप्पा, बीआरसी अधिकारी ए आर अंबगी, तालुका क्रीडाधिकारी सुरेखा मिरजी, तालुका अक्षरदासोह अधिकारी महांतेश कित्तूर, शिरोली केंद्राचे सीआरपी बी.ए. देसाई यानी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रमेश कवळेकर, सहशिक्षक विजय पाटील, समीक्षा कवळेकर, वैशाली पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम गावकर, उपाध्यक्षा सपना गावकर यांनी अभिनंदन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta