
खानापूर : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या पत्नीसोबत खानापूर येथे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या जिजाऊ गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे बंधू सुरेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta