खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे सांस्कृतिक, कला, क्रीडा स्पर्धामध्ये नेहमी अग्रेसर असणारं विद्यालय असून तालुक्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतात. शिक्षणात बरोबर क्रीडा क्षेत्रातही खेडोपाड्यातील विद्यार्थिनींनी आपला नावलौकिक वाढवून सरकारी सेवेतील आरक्षणाचा फायदा घ्यावा या हेतूने कार्यरत असणाऱ्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांचा मनोदय स्पष्ट मनोदय दिसून येतो.
आजवर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी त्याने अनेक उपक्रम राबवून खेळ कौशल्य शोधण्याचा आणि विकसित करण्याचा मनोदय प्रत्यक्ष उतरविला आहे.
ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील कबड्डीपट्टू विद्यार्थिनी ऊन, वारा, पाऊस आणि चिखल याची तमा न बाळगता गेले दोन तीन महिने सातत्याने सराव करताहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील बावीस पदवीपूर्व महाविद्यालयांना मात करून त्यांनी पहिला नंबर मिळविल्याची बातमी ताजी असताना श्री गणेश चतुर्थीनिमित्त मौजे गर्बेनहट्टी येथे आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेत मोठ्या धाडसाने सहभागी झाल्या.
अनेक संघाचा पराभव करत त्या अंतिम सामन्यात पोहचल्या आणि बेळगाव जिल्ह्यातील नामवंत देसूर कबड्डी संघाशी त्यांची मुकाबला झाला. या अटीतटीच्या सामन्यात उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ करीत, शरिराने आणि ताकदीने खूप वरचढ असलेल्या अनुभवी खेळाडूंचा एकहाती पराभव करीत प्रथम क्रमांकाचे रोख रूपये आठ हजार व आकर्षक चषक पटकावला . याच बरोबर कबड्डी संघ कॅप्टन कुमारी लक्ष्मी गोरल हिने नेत्रदीपक पकडी केल्या. ताराराणी संघाची स्टार रेडर कुमारी साधना होसुरकर हिला रोख रक्कमेसह बेस्ट रेडर हा मानाचा किताब मिळाला.
या संघाला मार्गदर्शन श्री. भरमाजी पाटील चन्नेवाडी, प्रो कबड्डी खेळाडू श्री. आप्पाजी पाटील व श्री. मोहनगेकर सर कोवड, प्रा. आर. व्ही मरितम्मण्णावर, भिमसेन यांचे मार्गदर्शन लाभत असून मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू, संचालक श्री. शिवाजीराव पाटील, श्री. परशराम गुरव यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
प्राचार्य अरविंद पाटील व प्राध्यापक वर्गाच्या यांच्या नियोजनाखाली सदर खेळाडू नियमित सराव करत असून पुढे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत चांगलं यश मिळवून येथील कबड्डी खेळाडू महिला प्रो कबड्डी सारख्या मानाच्या स्पर्धेत जाऊन पोहचतील असा आशावाद कबड्डी प्रेमीकडून व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta