खानापूर (प्रतिनिधी) : बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्याचे तहसीलदार प्रदिपकुमार हिरेमठ यांच्यावर शुक्रवारी दि. २८ रोजी समाजकंटकानी त्यांच्या कार्यालयात घुसून सरकारी कामात व्यत्यय आणत त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्लेखोराचा तपास करून त्यांना कठोर शासन करावे. सरकारी नोकरवर्गाला न्याय मिळवून द्यावा.
या मागणीसाठी खानापूर तालुका सरकारी नोकर संघाच्यावतीने खानापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्याचे तहसीलदार प्रदिपकुमार हिरेमठ हे आपल्या कामात असताना सरकारी कार्यालयात घुसून गैरकृत्य करण्यास भाग पाडवत त्यांच्यावर हल्ला केला. या कृत्याचा निषेध करत हल्लेखोरांना अटक करावी. त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष बी. एम. यळ्ळूर, सभासद के एच कौंदलकर, उपतहसीदार के. एम. कोलकार, वाय. एम. पाटील, व्ही. एस. बिरादार पाटील, देसाई, एल. बी. जमादार, विजयकुमार बेळगावी, गिरीष कुरहट्टी, रवी अन्नीगेरी, संदीप माळगी, विनायक खन्नूकर, श्री. मॅगेरी, श्री. हिरेमठ, आदी नोकर संघाचे सभासद नोकरवर्ग उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …