
खानापूर : श्रीदेव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे शुभारंभ शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी मणतुर्गे येथे गावचे सुपुत्र श्री. अविनाश नारायण पाटील, उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. विजय प्रकाश पाटील निवृत्त लष्करी हवालदार होते.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत श्री. नामदेव गुंडु गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या समयी श्री रवळनाथ पूजन श्री. रतन प्रकाश गुरव, गणेश पूजन श्री. माणिकराव देसाई, हनुमान पूजन श्री. गोपाळ पाटील, विठ्ठल-रुक्मिनी पूजन श्री. अजित पाटील, कलावती आई पूजन ॲडव्होकेट कु. प्रगती मारुती देसाई, कासव पूजन श्री. बालाजी देवकरी, तुळशी पूजन श्री. विलास सुतार सरपंच तुडये यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, या समयी ॲडव्होकेट प्रगती देसाई, कु. मनाली पाटील डिझाईन इंजिनिअर मर्सिडीज बेंझ, श्री. सुर्याजी देवकरी निवृत्त पीडीओ, श्री. विजय पाटील निवृत्त हवालदार भारतीय सेना, श्री. यल्लाप्पा मांगेलकर निवृत्त सुभेदार भारतीय सेना, श्री. शिवराम पाटील निवृत्त हेस्कॉम कर्मचारी यांचा सत्कार श्रीदेव रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले, कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब शेलार, सेक्रेटरी श्री. प्रकाश गुरव, खजिनदार श्री. शांताराम पाटील, सदस्य श्री. प्रकाश पाटील, श्री. मर्याप्पा देवकरी, श्री. विजय भटवाडकर, श्री. बळवंत देसाई, श्री. मल्लाप्पा देवलतकर, श्री. नारायण गुंडपीकर, श्री. कृष्णाजी देवलतकर, उद्योजक दिपकराव पाटील, काँग्रेस कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री. अविनाश पाटील यांनी कै. नारायण सुराप्पा पाटील व कै. लक्ष्मी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये जाहीर केले आहे. यावेळी खालील देणगीदार कु. मनाली व स्वराली दिपकराव पाटील २१००० रुपये, रतन प्रकाश गुरव १५५५५ रुपये, यल्लाप्पा गुंडु मांगेलकर १५०५१ रुपये, संजय दत्तू गुरव ११५०५ रुपये, प्रसादसिंह आबासाहेब दळवी १११११ रुपये, ईश्वर रामचंद्र भटवाडकर ११००० रुपये, विलास सुतार सरपंच तुडये १०००१ रुपये, गंगाराम पुंडलिक देवकरी ८८८८ रुपये, मारुती माणिकराव देसाई ७७७७ रुपये, विश्वनाथ मारुती देवकरी ५५५५ रुपये, कु. रोहन व कु. रोहिणी रविंद्र गुंडपीकर ५५५५ रुपये, विजय प्रकाश पाटील ५१५१ रुपये, श्रीकांत पांडुरंग बोबाटे ५००१ रुपये, मारुती कृष्णा देवकरी ५०५५ रुपये, विनायक नारायण पाटील ५००१ रुपये, श्रीपाद नारायण पाटील ५००१ रुपये, गंगाराम नारायण देवलतकर ५००१ रुपये, शिवराम मष्णू पाटील ३०२० रुपये, अजित राजाराम पाटील २१०० रुपये, ऋषिकेश देवलतकर २१०० रुपये, प्रमोद मारुती गुंडपीकर २१०० रुपये, भरमाणी बळीराम देवलतकर २००१ रुपये, विठ्ठल नामदेव गुरव १५०१ रुपये, अनंत मनोहर गुंडपीकर ११११ रुपये, प्रशांत तुकाराम पेडणेकर ११०१ रुपये, ॲडव्होकेट प्रगती देसाई ११०१ रुपये, राजाराम महादेव देसाई १०५१ रुपये, सुर्याजी गणपती देवकरी ११०० रुपये, सुनिल मर्याप्पा देवकरी, प्रणय पांडुरंग देसाई १००१ रुपये, प्रद्युम्न विठ्ठल देवकरी १००१ रुपये, अभिजित हणमंत देवकरी १००१ रुपये, पुंडलिक कृष्णा चोर्लेकर १००१ रुपये, नारायण तुकाराम लोहार १००१ रुपये, सुभाष कृष्णा चोर्लेकर १००० रुपये, अमित राजाराम पाटील ५२१ रुपये, प्रशांत भटवाडकर ५०० रूपये, रेश्मा गिरीश नाईक कारवार ५०१ रुपये, तुषार शिवाजी गावडे ५०० रुपये, मनोज लक्ष्मण देवलतकर ५०० रुपये, गणपती महादेव चोर्लेकर ५०१ रुपये, श्री नामदेव गुंडु गुरव ५०१ रुपये, नुतन देवाप्पा गुरव ५०१ रुपये, सचिन पांडुरंग पाटील ५०१ रुपये, बबन विठ्ठल देसाई ५०० रुपये, सुरज नामदेव गुंडपीकर ५०० रुपये, अशोक बाबाजी देसाई ५०० रुपये, रामचंद्र उमाजी गावकर ५०० रुपये, मारुती मष्णू गुरव ५०० रुपये, कृष्णा मधू देसाई ५०१ रुपये, संतोष सटवाप्पा पाटील ५०१ रुपये, सौ. यमुना विठ्ठल देसाई अडकूर ५०० रुपये, रामा सटवाप्पा मादार १०१ रुपये इतकी देणगी देऊ केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. ईश्वर मंगेश बोबाटे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta