खानापूर : चापगांव ता. खानापूर तालुक्यातील सकल मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
सिमा भागातील खानापूर तालुक्यातील चापगांव समस्त मराठा बांधव एकत्रित येवून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले. “कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुमारे साथ है” अशा घोषणा करत परिसर दणाणून सोडला.
या अंदोलनावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमेश धबाले, पिराजी कुऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
तासगाव तालुका खानापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी चापगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश धबाले, पिराजी कुऱ्हाडे, माजी सभापती मल्लाप्पा मारिहाळ, नागराज धबाले, अभिजीत पाटील, नारायण गोदी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नजीर सनदी, विलास धबाले, हनुमंत पाटील, मुकुंद पाटील, मष्णू चोपडे, शिवाजी मादार सह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta