Saturday , December 13 2025
Breaking News

चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; खानापूरातील घटना

Spread the love

खानापूर : मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील माणिकवाडी गावात उघडकीस आली आहे. वेंकप्पा मल्लारी मयेकर (वय 18 वर्षे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रुमेवाडी येथील नागराज गुंडू बेडरे व विजय गुंडू बेडरे या दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

तक्रारदार मल्लारी विठ्ठल मयेकर (रा. माणिकवाडी, ता. खानापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिवंगत वेंकाप्पा मल्हारी मयेकर, हा आरोपींच्या रुमेवाडी येथील विराज लॉजमध्ये मजूर म्हणून काम करत होता. या काळात लॉजमध्ये सोन्याच्या चोरीचा संशय घेऊन आरोपींनी वेंकाप्पा याला जबर मारहाण केली होती. त्यानंतर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 7.00 वाजता आरोपींनी वेंकाप्पाला त्यांच्या बुलेट मोटारसायकलवर बसवून माणिकवाडीतील त्याच्या घरी आणले. तेथे त्याला तोंडावर, छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून “हा प्रकार कुणाला सांगितलास तर संपवून टाकू” अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा त्याला लॉजमध्ये नेऊन तिथेही मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याच्या पोटाला व छातीत गंभीर दुखापती झाल्या. कुटुंबीयांनी त्याला सुरुवातीला बेळगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तब्येत सुधारली नाही म्हणून 26 ऑगस्ट रोजी अपूर्वा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथून पुढे 31 ऑगस्ट रोजी बीआयएमएस (जिल्हा रुग्णालयात) हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच 4 सप्टेंबर रोजी पहाटे 1.20 वाजता वेंकाप्पाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, या घटनेचा तपास पीआय एल. एच. गवंडी करीत आहेत. आरोपी नागराज व विजय बेडरे यांच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम 127(2), 115(2), 140(1), 103(1), 352, 351(2) तसेच सहकलम 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस

Spread the love  खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *